- पत्ता - ८/३८३, जुनी मिल कंपाऊंड, मुरारजी पेठ, सोलापूर.
- शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता - B.A., D.Ed., DSM., CPCT, MCJ
- शाळेचे नाव व पत्ता - श्री समर्थ विद्या मंदिर, शास्त्री नगर, दक्षिण सदर बझार, सोलापूर.
- संकेतस्थळ - www.srujanshilshikshak.in
- ब्लॉग - www.srujanshilshikshak.blogspot.in
- मोबाईल क्र. - ७७७४ ८८ ३३ ८८
- ई-मेल - srujanrajkiran@gmail.com
पुरस्कार
- ‘साने गुरुजी गुणवंत शिक्षक पुरस्कार-2016’
- श्री समर्थ दलित शिक्षण प्रसारक मंडळ, सोलापूर या संस्थेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार- २०१६’
- प्रिसिजन आयोजित 354 शिक्षकांच्या प्रतिसाद कार्यशाळेत सर्वोत्कृष्ट सादरीकरणास प्रथम क्रमांकाचे पारितोषक -2017
- शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल श्री दशभुजा गणपती युवक प्रतिष्ठान, सोलापूरतर्फे पुरस्कार -2017
- महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर चा ‘उपक्रमशील शिक्षक पुरस्कार’ -2017
- सानेगुरुजी शिक्षक पतसंस्थेकडून मनपा शिक्षण मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मनपा आदर्श शिक्षक म्हणून सन्मानचिन्ह देऊन विशेष पुरस्कार - 2017
- अपुर्वा अभिमीत ज्ञानपीठ 'राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार'- 2017-18
- लोकमंगल फाऊंडेशनचा प्रतिष्ठित ‘लोकमंगल शिक्षकरत्न पुरस्कार २०१8’(‘इनोव्हेटिव्ह टीचर’ म्हणून निवड)
- रोटरी क्लब ऑफ सोलापूरचा ‘नेशन बिल्डर अवॉर्ड– २०१8’
- आय.आय.एम. अहमदाबादचा ‘टीचर इनोव्हेशन अवॉर्ड -२०१8’
- सारथी ‘उपक्रमशील शिक्षक’ पुरस्कार -२०१9'
- सोसायटी फॉर सोशल इनोव्हेशन डेव्हलपमेंट, पुणे (एसएसआयडी, पुणे) चा ‘इनोव्हेटिव्ह टीचर एक्सलन्स अवॉर्ड -२०२०’
- जागर फाऊंडेशन आयोजित ‘राज्यस्तरीय निबंध स्पर्धा -2020’ – राज्यात प्रथम
- श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय, सोलापूर यांचा ‘आदर्श माता-पिता पुरस्कार 2019-20’
गुगल क्लासरूम
सध्याच्या लॉकडाऊन काळामध्ये शिक्षणात ज्या ॲप्लिकेशनचा वापर जोरात सुरू आहे ते म्हणजे ‘गुगल क्लासरूम’. हे एक असं ॲप्लिकेशन आहे ज्या माध्यमातून मुलांसाठी ऑनलाइन शिक्षणाची कवाडं अजून चांगल्या पद्धतीनं खुली झाली आहेत. यामध्ये प्रत्येक वर्गासाठी आपण क्लासरूम तयार करू शकतो. यासाठी आपल्याला प्रत्यक्ष घर सोडून कुठं जाण्याची आवश्यकता नाही. गुगल क्लासरूमचा वापर करून शिक्षक-विद्यार्थी यांची ‘शिकवणं आणि शिकणं’ ही प्रक्रिया पार पाडता येते. यात क्लासचे शिक्षक आपली (व्हर्च्युअल) क्लासरूम तयार करतात आणि या शिक्षकाकडून दिलेल्या क्लास कोडच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जॉईन व्हायचं असतं. अधिक वाचा...
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती (भाग 2)
मागील भागामध्ये आपण पाहिलं की, मोबाईल वरती शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी करावी या संदर्भातली माहिती. आजच्या लेखामध्ये कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती कशी करायची हे पाहणार आहोत.
शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती (भाग 1)
असं म्हणतात की, एक चित्र हजारों शब्दांचं काम करतं. तर मग विचार करा एक व्हिडीओ किती शब्दांचं काम करत असेल? नक्कीच एक व्हिडिओ लाखो शब्दांचं काम करु शकतो. अनेक गोष्टी आपण न सांगताही व्हिडिओच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पटवून देऊ शकतो.
ब्रॉडकास्ट ग्रुप मॅसेज
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दिलेला अभ्यास हा त्या ग्रुप मधल्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना ग्रुपमध्येच पाहता येतो. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी केलेला सर्व अभ्यासही विद्यार्थी याच ग्रुपवर पोस्ट करत असतात. ग्रुपवर यामुळं अनेक पोस्ट्सचा अगदी भडिमारच पाहायला मिळतो.
स्क्रीन रेकॉर्डिंग
शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जसजसा वाढत आहे तसतशा त्यातून निर्माण होणाऱ्या गरजाही वाढत आहेत. या गरजेतूनच ‘स्क्रीन रेकॉर्डिंग’हा शिक्षणातील तंत्रज्ञानासंदर्भातील नवीन प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय.
अॅनोटेशन
सोप्या भाषेत सांगायचं झालंच तर अॅनोटेशन म्हणजे अशी व्यवस्था, ज्या मध्ये आपण पीडीएफ, फोटो किंवा mp4 अशा कोणत्याही फॉरमॅटमध्ये आपल्याला महत्त्वाच्या वाटणार्या. मुद्दांना, एखाद्या गोष्टीला अधोरेखित करणंं किंवा एखाद्या गोष्टीला बाणाने दर्शवणं यासारख्या गोष्टी करू शकतो.
ॲनिमेटेड पीपीटी
ॲडव्हान्स वापर केला तरआपणॲनिमेटेड पीपीटीच्या साह्यानं नेहमीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला विद्यार्थ्यां समोरआपलं सादरीकरण करता येऊ शकतं, आपला विषय त्यांच्यासमोर आणखी चांगल्या पद्धतीनं मांडता येऊ शकतो.
ई-परीक्षा (भाग-2)
मागील लेखामध्ये आपण पाहिलं की, प्रत्यक्षात मुलांना समोर न बसवताही ऑनलाईन पद्धतीनं, व्हर्च्युअली परीक्षा कशी घ्यायची? या संदर्भातील माहिती. आजच्या या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की, ई परीक्षा ऑफलाईन कशी घ्यायची?
ई-परीक्षा (भाग-1)
कोरोनाच्या या संकटामध्ये मुलांना सध्या ऑनलाईन पद्धतीनं शिकवणं सुरू आहे. शिकवलेलं या मुलांना कितपत समजलं हे जाणून घेण्यासाठी त्यांचं मूल्यमापन करणं, त्यांची एखादी चाचणी, एखादी परीक्षा घेणं हा एक शिक्षणाचा भाग आहे.
शिक्षणात 4D चा वापर
शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग सध्या चालू आहेत. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे फोर डी ॲप्लिकेशनचा वापर करून अध्ययन आणि अध्यापन करणं होय.या लेखात शिक्षणामध्ये 4D चा वापर कसा करता येऊ शकतो हे काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया.
स्क्रीन कास्ट
आज मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅबलेट,प्रोजेक्टर आदी इक्विपमेंट्सचा शिक्षणामध्ये वापर वाढलाय. त्यामुळं ई-लर्निंग प्रक्रिया अधिक गतिमान होताना दिसतेय. यामध्ये आणखी एक प्रकार आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे ‘स्क्रीन कास्ट’ किंवा ‘स्क्रीन मिरर’चा.
गुगल फॉर्म्स
गेल्या तीन-चार वर्षांमध्ये गुगल फॉर्म्स हा सर्वांच्या परिचयाचा शब्द बनला आहे. खासकरून लॉकडाऊनच्या काळात तर याचं महत्व आणि वापर दोन्हीही किती वाढलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ‘गुगल फॉर्म्’' ही गुगलची एक विनामूल्य ऑनलाईन सेवा आहे.
गुगल मॅप्स
‘गुगल मॅप्स’हे नाव आज अनेकांना परिचित आहे. आज प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये हे ॲप बाय डिफॉल्ट आपल्याला पाहायला मिळतं. कारण आता अनेक कंपन्यांना हे ॲप मोबाईलमध्ये इन्स्टॉल असण्याची गरज वाटते. पण आपण याला शैक्षणिक दृष्टिकोनातून कसं वापरावं?
एज्युकेशनल ई- क्लिनिक
नाव ऐकल्यावर थोडं वेगळं वाटलं असेल, परंतु काळानुसार ही गोष्ट सुद्धा आता लागू पडेल. कारण दवाखाना, क्लिनिक, हॉस्पिटल हे शब्द आपण आतापर्यंत ऐकलेले आहेतच.आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत की, एज्युकेशनल ई-क्लिनिक म्हणजे काय?
हॅशटॅग म्हणजे काय?
सध्या 'हॅशटॅग' हा शब्द अनेक ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु हॅशटॅग म्हणजे नेमकं काय? त्याचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो? कोणकोणत्या ठिकाणी हा वापरतात आणि हॅशटॅग कशा पद्धतीने तयार करावा? या सर्व गोष्टींची माहिती आपण आजच्या लेखामध्ये घेणार आहोत.
गुगल ड्राईव्ह
गुगलच्या अनेक प्रोडक्टपैकी एक परिणामकारक प्रोडक्ट म्हणजे ‘गुगल ड्राईव्ह.’ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन आपल्याला सापडेलच. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर ते तुम्ही प्ले स्टोअरवरूनही डाऊनलोड करून घेऊ शकता. शैक्षणिक दृष्टिकोनातून गुगल ड्राईव्हचा विचार करता हे आपल्यासाठी खूप उपयोगी ॲप्लिकेशन ठरू शकतं.आपल्याला वर्गातील अनेक मुलांचे फोटो, त्यांच्या संदर्भातल्या माहितीची फाईल, व्हिडिओज, पीपीटी स्टोअर करून ठेवायचे असतील तर गुगल ड्राईव्ह आपल्याला फायदेशीर आहे. तसंच त्या फाईल्स आपण डाऊनलोड किंवा इतरांना शेअरही करू शकतो.
अधिक वाचा...